1. राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2022 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर “माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
2. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर नजिकच्या औ.प्र. संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित (Confirmation) करणे अनिवार्य आहे.
3. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करावेत.