शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे Dassault Aviation, France यांच्या सहकार्याने शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत “Aeronautical Structure and Equipment Fitter” हा दोन वर्ष कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रम (अर्हता- इयत्ता 10 वी उत्तीर्ण) सुरू करण्यात आलेला आहे. यावर्षी या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एका तुकडीत एकूण 20 उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. तरी, प्रवेशसत्र ऑगस्ट 2019 साठी ऑनलाईन नोंदणी केलेले प्रवेशित वा अप्रवेशित अशा सर्व उमेदवारांपैकी या व्यवसायात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दि. 25 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी ठिक 8.00 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे सर्व विहित कागदपत्रांच्या मुळ प्रतींसह हजर राहुन आपली उपस्थिती नोंदवावी. उपस्थित उमेदवारांमधुन याच दिवशी गुणवत्ता यादी तयार करण्यात येवून दि.26 सप्टेंबर, 2019 रोजी प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल.
प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी "MahaITI App" नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी
Read More >>
प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची ऑगस्ट 2019 च्या सत्रातील प्रवेशाची मुदत दि.21 ऑक्टोबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सबब, प्रशोच्छुक उमेदवारांना शासकीय औ.प्र.संस्थांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून त्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहे.